Induction and Orientation Program for First Year Students 2019-2020

आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांसाठीप्रेरणा व दिशादर्शन” कार्यक्रम संपन्न !

(Induction And Orientation program)

आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात नुकताच प्रवेश घेतलेल्या प्रथम बी. फार्मसी आणि बी .टेक (कॉस्मेटिक्स)  च्या विद्यार्थ्यांचे मनोबल  व आत्मविश्वास वाढविण्याकरिता महाविद्यालया तर्फै पाच दिवसीय ‘प्रेरणा व दिशादर्शन’ कार्यक्रम एस. एम. पटेल. ऑडिटोरियम हॉल येथे पार पडला. महाविद्यलयाने प्रथमच  पंचदिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित केला याअगोदर एकदिवसीय अथवा दोन दिवस हा कार्यक्रम होत असे सदर कार्यक्रम प्रथम वर्ष बी.फार्मसी समन्वयक (को-ओर्डीनेटर) प्रा. डॉ. ए. पी. गोरले आणि सर्व वर्गशिक्षक  यांनी आयोजित केला. कार्यक्रमास नवीन प्रवेशित  ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे उदघाटन दि. ६ ऑगस्ट २०१९ रोजी संस्थेचे संचालक, माजी कुलगुरू, उमवि, जळगाव प्रा. डॉ. के. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उदघाटनप्रसंगी व्यासपिठावर प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर, डिप्लोमा फार्मसी प्राचार्य डॉ. नितीन हसवानी, डॉ. सी. आर. पाटील, डॉ. एच. एस. महाजन, डॉ.  सी आर पाटील डॉ. एस. एस. चालिकवार, श्रीमती डॉ. एस. डी. पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम प्राचार्य डॉ. सुराणा यांनी अध्यक्षांचे स्वागत केले. डॉ. अतुल शिरखेडकर यांनी प्रस्तावना सादर केली. या वेळी त्यांनी नुकताच एच.एस.सी. उत्तीर्ण होऊन प्रवेश प्राप्त विद्यार्थांनी नवीन महाविद्यालयात आल्यानंतर येथून आपला सर्वांगीण विकास कसा होईल हे स्पष्ट केले. तसेच सतत उत्साह बाळगून, जिद्द आणि चिकाटीने अभ्यासातच नव्हे तर महाविद्यालयातील इतर को-करिक्युलर आणि एक्सट्रा-करिक्युलर क्रियाकलाप मध्ये विकास कसा करता येईल जेणे करून फार्मसी क्षेत्रात उत्तमोत्तर कामगिरी करता येईल हे सांगितले.

प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बद्दल सविस्तर माहिती दिली. पावर पॉईंट च्या माध्यमातून विस्तृत प्रेसेंटेशन दिले. प्राचार्यानी प्रेसेंटेशन मध्ये सुरवातीला १९९२ पासून ते आजपर्यंत ह्या गेल्या २५ वर्षां मध्ये केलेल्या प्रगतीचा आलेख सांगितला पुढे त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंट्स, येथील लॅबोरेटोरीज व त्यामध्ये उपलब्ध असलेले सर्व अत्याधुनिक उपकरणे व सुविधा यांची प्रत्यक्ष्य छायाचित्रांच्या स्वरूपात अवलोकन करून दिले. सर्व विभाग प्रमुख व त्या-त्या विभागातील शिक्षक यांची ओळख करून दिली. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली नुसार प्रथम वर्ष बी. फार्मसी चा नवीन अभ्यासक्रम (syllabus) व परीक्षा पद्धती तपशीलवार स्वरूपाने समजावून सांगितला. तसेच पी.सी.आई. नवी दिल्ली च्या निर्देशां प्रमाणे ‘सतत अद्ययावत मूल्यमापन’ (continuous mode evaluation ) ह्या एका विशिष्ट परीक्षा प्रणाली चा समावेश करण्यात आला आहे तो कसा असणार आहे हे देखील विद्यार्थाना या वेळी समजावून सांगितले. बी. फार्मसी पदवी नंतर कुठल्या संधी  उपलब्ध आहेत ते विद्यार्थाना सांगितले. देशातील राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आपल्या महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती साठी प्रत्येक वर्षी येत असतात. विविध फार्मसी उद्द्योगसमूहा बद्दल माहिती दिली. भारतातील औषधींचे मार्केट व फार्मासिस्ट म्हणून तेथील नोकरी/ उद्द्योग साठीच्या संध्या सांगितले. आजवर आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी फार्मसी क्षेत्रात दिलेले योगदान सांगितले. माजी विद्यार्थी हे बहुराष्ट्रीय औषध कंपन्या मध्ये वरीष्ठ पदावरती रुजू असून काही उच्च शिक्षण असो अथवा नोकरीसाठी परदेशात महाविद्यालयाचे नाव लौकिक करत आहेत. यापुढे देखील विद्यार्थी नक्कीच हा वारसा कायम ठेवावा असे आवाहन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 डॉ. के. बी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सदर प्रेरणा व दिशादर्शन कार्यक्रम नवीन विद्यार्थ्यांसाठी का घेतला जातो त्याचे महत्व स्पष्ट करून दिले. महाराष्ट्रातील विविध शहर आणि गावांतून बी. फार्मसी कोर्स च्या  प्रवेश परीक्षेत किंवा नीट परीक्षेत टॉप स्कोर करून प्रवेश मिळाल्या नंतर आता एकंदरीत हा अभ्यासक्रम पूर्ण करताना कोणत्या गोष्टीं कडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे, तसेच शिक्षण केवळ पदवी संपादन करण्याच्या नव्हे तर समाजाभिमुख/ राष्ट्राभिमुक सेवा प्रदान करण्याचा दृष्टिकोन बाळगून घेतले पाहिजे असे प्रतिपादन केले.डॉ. ए. पी. गोरले यांनी पाहुण्याचे आभार व्यक्त केले

दुसऱ्या दिवशी दि. ७ ऑगस्ट रोजी विद्यार्थाना इंग्रजी भाषेचे महत्व व दैनंदिन जीवनात या भाषेचा किती वापर होतो यावरती व्याख्याना साठी, सारस्वत इंग्लिश अकॅडेमि, सुरत येथील श्री. किशोर सोनावणे व चिंतन किशोर सोनवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे स्वागत डॉ. शिरखेडकर यांनी केले. श्री. किशोर सोनावणे यांनी ग्रामीण भागातील मुलांमध्ये इंग्लिश ची भीती, आत्मविश्वासाची कमतरता,  यामुळे न्यूनगंड निर्माण होतो तेव्हा त्यांना समुपदेशनाची गरज भासते म्हणूनच सकारात्मक विचार, स्वताची जाणीव, स्वतःची कौशल्ये आणि आनंद या सर्वांची छोट्या उदाहरणातून ओळख करून दिली.

तिसऱ्या दिवशी दि ८ ऑगस्ट रोजी महाविद्यलयातील प्राध्यापक विभागप्रमुख (फार्मास्युटिक्स) डॉ. एच. एस. महाजन यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि त्यातील कार्यभार या विषयावर माहिती दिली. डॉ. एम. जी. कळसकर यांनी फार्माकोग्नोसी या विषयाची ओळख करून दिली या विषयामध्ये औषधी वनस्पतीचा अभ्यास केला जातो दैनंदिन जीवनातील औषधी वनस्पतींची तोंडओळख करून दिली. डॉ. एस. डी. पाटील  यांनी जीवशास्त्राचे फार्मासिमधील महत्व आणि त्याचा अभ्यासक्रम या विषयाबद्दल भाष्य केले. डॉ एस. सी. खडसे यांनी रसायनशास्त्रातील मुलभूत संज्ञा समीकरणे याबद्दल माहिती दिली आणि विद्यर्थ्यांकडून उजळणी करून घेतली.

दि ९ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी ‘स्कोप अँड पोटेन्शिअल अफ्टर फार्मसी’ या विषयावर एक दिवसीय सर्टिफिकेट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम साठी पुणे येथील ‘फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’  (I. P. E. R. पुणे) चे संचालक डॉ. महेश बुरांडे यांचे प्रमुख अतिथी व त्यांचे सहकारी मान्यवर श्री. चंद्रशेखर भींगारे, श्री. सतीश केळकर, श्री. समीर बुरांडे प्रथम वर्ष बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी बी. फार्मसी हि पदवी घेऊन देशात तसेच परदेशात कुठल्या संधी उपलब्ध आहेत ते जाणून घेण्यासाठी  ‘ स्कोप अँड पोटेंशियल अफ्टर फार्मसी ‘ हा विषय  इंडक्शन प्रोग्राम मध्ये समाविष्ट करण्यात आला असून विदयार्थ्यांना त्याचे ध्येय निश्चित करण्यास उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा यांनी केले.

डॉ. महेश बुरांडे यांनी महाविद्यालयाची प्रगती पाहून येथील मानांकने तसेच विदयार्थ्यांची सर्वांगीण विकास घडविण्याची शिक्षण प्रणाली पाहून समाधान व्यक्त केले, ह्या एक दिवसीय प्रोग्राम चे स्वरूप स्पष्ठ केले, प्रोडक्शन, रेगुलेटोरी, गव्हर्नमेंट जॉब्स, या क्षेत्रातील विविध संधी तसेच त्या साठी लागणारी विद्यार्थांनी करावयाची तयारी व सर्वात महत्वाचे विद्यार्थ्यांची सकारात्मक विचारशक्तीचा विकास, या बाबत राहील असे स्पष्ट केले. श्री. समीर बुरांडे यांनी सकाळच्या सत्रात इंडियन फार्मा मार्केट ची माहिती दिली, गेल्या ४ दशकां पासून फार्मासुटिकल इंडस्ट्री मध्ये आमूलाग्र बदल झाला आहे व हि वाढ झपाट्याने वाढत आहे. २० हजार हुन अधिक कंपन्या भारतात उदयास आल्या आहेत व वाढ करत आहे. फार्मासिस्ट, बी. फार्मसी पदवी धारकांची अत्यंत गरज भासत आहे. भारतातील २० प्रमुख कंपन्यांमध्ये १६ भारतीय मूळच्या कंपन्यांचा समावेश आहे. पहिल्या १०० कंपन्यां मध्ये आज हि १० टक्क्याहून अधिक जॉब्स साठी जागा रिक्त आहे. येत्या काळात फार्मा कंपन्यांचा व्याप वाढणार आहे. भारत देशातच नाही तर सौदी अरेबिया, दुबई सारख्या ठिकाणी प्रचंड बी. फार्मसी पदवी धारकांची व फार्मासिस्ट ची मागणी आहे असे सांगितले.

श्री. चंद्रशेखर भींगारे यांना प्रोडक्शन विभागाचा प्रदीर्घ अनुभव असून, यांनी औषध कंपन्यांमध्ये प्रोडक्शन आणि मॅनुफॅक्चरिंग क्षेत्रामधील स्कोप सांगितला तसेच कंपनी मध्ये टॅब्लेट्स, कॅप्सूल्स, सिरप मॅनुफॅक्चरिंग साठी कुठले विविध ऑपरेशन्स युनिट्स असतात त्या मध्ये बी.फार्मसी नंतर ची संधी या बाबत विस्तृत व्याख्यान केले. फार्मास्युटिकल मॅनेजमेंटचे सिद्धांत व अभ्यास, गुणवत्ता नियंत्रण आणि गुणवत्ता आश्वासन (क्वालिटी कंट्रोल व क्वालिटी अशुरन्स) याचा अर्थ व त्याची संरचनाची स्पष्ट केली. औषधींची गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कार्य व उत्तरदायित्व सांगितले. जीएमपी (गुड मॅनुफॅक्चरिंग प्रॅक्टिस) बद्दल माहिती दिली. आयएसओ 9000, औषध पॅकिंग सामग्रीचे मूल्यांकन अश्या विविध बाबींवर प्रत्याक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थाना मार्गदर्शन केले. कंपनी मधे प्रत्येक कामाची एक एस.ओ.पी. (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) असते व त्याचा वापर कसा करावा त्याचे फायदे या बद्दल विद्यार्थाना माहिती दिली.

श्री. सतीश केळकर यांना ३० वर्षां हुन अधिक मार्केटिंग व सेल्स विभागाचा अनुभव असून त्यांनी फायझर, नोव्हार्टीस सारख्या उद्योग समूहानं मध्ये एरिया मॅनेजर, झोनल मॅनेजर तसेच बिझिनेस युनिट हेड सारखे पद सांभाळले आहे. फार्मासुटिकल मार्केटिंग, मेडिकल रेप्रेसेंटेटिव्ह जॉब्स बदल माहिती दिली. फार्मास्युटिकल मार्केटिंग विभाग संरचना, एम.आर.च्या माध्यमातून फार्मास्युटिकल उत्पादनाची जाहिरात आणि विक्री प्रमोशन, वैद्यकीय प्रतिनिधींचे कार्य व अहवाल, वैद्यकीय प्रतिनिधींसाठी तांत्रिक ज्ञान, वैद्यकीय प्रतिनिधीचे व्यक्तिमत्व विकास हे सर्व ठळक मुद्दे आपल्या व्याख्यानात अधोरेखित केले. ह्या क्षेत्रात काम करत असताना, इन्सेन्टिव्ह, बोनस इ. च्या माध्यमातून होणारी जलद वाढ हि ह्या क्षेत्राचे वैषिष्ट आहे हे ठाम सांगितले.

डॉ. महेश बुरांडे व श्री.समीर बुरांडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट चे महत्व सांगितले. मेडिकल स्टोअर्स, होलसेल स्टोअर्स मध्ये फार्मासिस्ट जॉब्स भारत बाहेर त्याचा स्कोप सांगितला. ड्रग स्टोअर आणि होलसेल ड्रग स्टोअर कसे सुरू करावे, रिटेल आणि होलसेल ड्रग स्टोअरमध्ये विक्री वाढ, व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी आदर्श ड्रग स्टोअर आणि घाऊक औषध स्टोअरचा प्रकल्प अहवाल या सर्व बाबीं वर भर दिला. शासकीय प्रक्रिया समजावून सांगितल्या.

शेवटच्या दिवशी दि १० ऑगस्ट  रोजी डॉ. एस. एस. चालिकवार यांनी फिजिकल फार्मसुटिक्स त्यातील शास्त्र, प्रमेय याबद्दल माहिती दिली  डॉ.पद्मजा आगरकर यांनी संभाषण कौशल्ये त्यांचे महत्व आणि विकास याबद्दल प्रशिक्षण दिले. तदनंतर प्रा. हेमाक्षी चौधरी यांनी मानवी शरीररचना  आणि कार्यप्रणाली याबद्दल थोडक्यात माहिती दिली. डॉ. हरून पटेल यांनी विविध स्पर्धा परीक्षा त्यांचा फार्मसी क्षेत्रातील प्रगतीसाठी उपयोग त्याची संरचना याबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. पी. एस. जैन यांनी सर्व रासायनिक द्रव्ये आणि रसायशास्त्रातील उपकरणे याबद्दल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांची झालेल्या व्याख्यान वरती लेखी परीक्षा घेण्यात आली व सहभागी सर्व विद्यार्थाना प्रशस्ती पत्रक देण्यात आले.

सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा  प्रतिसाद कौतुकास्पद होता अतिवर्षाव सुरु असतांनाही विदयार्थी संख्या कायम होती. या कार्यक्रमामुळे औषधनिर्माशास्त्र पदवी अभ्यासक्रम काय आहे आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जातात याचा आढावा कळला तसेच पदवी पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण अथवा व्यवसाय आणि नोकरीच्या संधी याबद्दल माहिती मिळाली असे विदयार्थ्यांच्या अभिप्रायातून स्पष्ट झाले असा कार्यक्रम व्यवसायिक शिक्षणाच्या सुरवातीस आयोजित केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य ,उप्राचार्य सर्व शिक्षकांचे मनोगतातून आभार मानले. या कार्यक्रमात प्रथम वर्ष बी टेक चे विद्यार्थ्यांचा हि सहभाग होता, व त्यांना डॉ मनोज गिरासे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगिता अग्रवाल व प्रा  स्नेहल भावसार यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समन्वयक डॉ. ए. पी. गोरले व प्रथम वर्षाचे वर्ग शिक्षक डॉ.  एस. बी. गणोरकर , डॉ. पी. जे. चौधरी, डॉ. व्ही. जी. उगले अंतिम वर्ष बी.फार्मसी चे कॉर्डीनेटर डॉ. एस. सी. खडसे यांनी परिश्रम घेतले. रजिस्ट्रार श्री जितेश जाधव यांचे सहकार्य लाभले.

संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री. अमरीशभाई पटेल, कार्यध्यक्ष तथा सहअध्यक्ष मा. श्री. भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष श्री. राजगोपालजी भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उप-प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम संपन्नयशस्वीरित्या  झाला.

Start Time

10:00 am

August 6, 2019

Finish Time

5:00 pm

August 10, 2019

Address

R. C. Patel Institute of Pharmaceutical Education and Research, Shirpur, district-Dhule, M.S. 425 405

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *