5 Days workshop on “Drug Design & Discovery”

5 Days workshop on Drug Design & Discovery in Collaboration with IIT Kharagpur (17th to 21st August 2019)

 

RCPIPER organised the 5 days workshop on Drug Discovery, Design and Development in collaboration with E-Cell IIT Kharagpur and Makeintern.

We invited aspiring M. Pharm/M.Sc/M. Tech/ JRFs/ SRFs and PhD scholars and faculty members to join this 5 Day workshop and excel in using open source tools for drug discovery, design and development.

Dr. S. J. Surana, Dr. Atul Shirkhedkar , Dr C R Patil and Mr Jitesh Doshi inugrated the session.

The mentor has provided hands on training and trained the participants to design their research projects in drug design.

The mentor has given training on different molecular modelling software viz Marvin Sketch, Chimera, Pymol, autoDock, Combinotorial Chemistry, Gromacs, AutoGrow.“आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात, आय. आय. टी. खरगपूर व मेकइंटर्न कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न”
शिरपूर येथील आर. सी. पटेल इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी एजुकेशन व रिसर्च आणि आय. आय. टी. खरगपूर (पश्चिम बंगाल) तसेच मेकइंटर्न कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने, दी. १७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट रोजी ५ दिवसीय ‘ड्रग डिस्कव्हरी, डिझायनिंग व डेव्हलोपमेंट’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत देशाभरातुन संगणका द्वारे औषधींचा अभ्यास व संशोधन करत असलेले विद्यार्थी, प्राध्यापक अश्या ३० डेलिगेट्स नि सहभाग घेतला होता. सदर कार्यशाळा हि ५ दिवस दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडली. कार्यशाळे साठी मेकइंटर्न या कंपनी मार्फत श्री. जितेश दोषी यांचे आगमन झाले होते. श्री. जितेश दोषी यांनी बायोइन्फोमॅटिक्स या विषयात अमेरिकेहून शिक्षण घेतले असून, विविध सॉफ्टवेअर वापरून औषध क्षेत्रातील तसेच केमेस्ट्री विषयातील संशोधन कसे करता येते हे त्यांनी या कार्यशाळेत सर्व सहभागी झालेल्या स्पर्धकांना ५ दिवस शिकवले.
मागील काही दशकांत संगणकाद्वारे नवीन औषधींचा शोध हा झपाट्याने होत आहे. एखाद्या नवीन औषधींचा शोध लागायला जगभरात आधी १२ ते १४ वर्ष लागत असे परंतु विविध सॉफ्टवेअर्स वापरून हा शोध आता ६ ते ८ वर्षांपर्यंत आला आहे हे त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले. आधी नवीन औषधींचा शोध करण्यासाठी अवाढव्य खर्च येत असे परंतु कॉम्पुटर एडेड ड्रग डिस्कव्हरी (कॅड) तंत्रा च्या वापरा मुळे हा खर्च अर्ध्यावर आलेला आहे व देशातील संशोधकांनी ह्या तंत्रप्रणाली चा वापर केला पाहिजे जेणेकरून भारतीय औषध क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल व त्याचा संपूर्ण जगाला फायदा होईल हे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या उदघाटनाला महावियालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सी. आर. पाटील, डॉ. हरून पटेल, डॉ. दीपक लोकवानी, श्री. जितेश दोषी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी प्रमुख पाहुणे यांचे स्वागत केले तसेच कार्यशाळेत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथून आलेल्या ३० स्पर्धकांचे अभिनंदन व्यक्त केले. प्राचार्यानी महाविद्यालयाची माहिती दिली तसेच महाविद्यालयात संशोधनासाठी लागणारी विविध सॉफ्टवेअर्स नि सुसज्ज आधुनिक कॅड लॅब असून त्याद्वारे संशोधन चालू आहेत असे नमूद केले. किंबहुना भारत सरकार कडून महाविद्यालयाला मिळालेल्या संशोधन निधी मध्ये कॅड तंत्रज्ञानाचा महत्वाचा वाटा आहे आणि म्हणून आय. आय. टी. खरगपूर (पश्चिम बंगाल) आणि मेकइंटर्न कंपनी ने सदर कार्यशाळा घेण्यासाठी आपल्या महाविद्यालयाची झोनल सेंटर म्हणून निवड केली आहे हे अधोरेखित केले. डॉ. अतुल शिरखेडकर यांनी कार्यशाळेचा विषय, यामध्ये ५ दिवसात काय शिकायला मिळणार आहे त्याची रूपरेषा समजावून सांगितली. समन्वयक डॉ. सी. आर. पाटील यांनी कार्यशाळेचे स्वरूप सांगितले त्यासाठी लागणारी पूर्वतयारी समजावली. कुठली कुठली सॉफ्टवेअर्स स्पर्धकांना शिकायला मिळणार आहे व स्वतः प्रात्यक्षिक करायला मिळणार आहे हे समजावून सांगितले.
संपूर्ण ५ दिवस श्री. जितेश दोषी, यांनी विविध सॉफ्टवेअर्स कसे हाताळायचे त्यातून नवीन औषधींचा अभ्यास व संशोधन कसे करायचे हे शिकवले व प्रत्यक्ष प्रयोग करून दाखविलेत. यामध्ये ऑटोडॉक व्हिना, कायमेरा, मर्विन स्केच, ग्रॉमॅक्स, स्विसडौक, लीगस्काऊट व आदी सॉफ्टवेअर्स चा समावेश होता.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी झालेल्या स्पर्धकांची लेखी परीक्षा घेण्यात आली व पहिल्या पाच उत्तीर्ण स्पर्धकांची नावे प्राचार्यानीं जाहीर केली. व त्यांची आय. आय. टी. खरगपूर (पश्चिम बंगाल) येथे होणाऱ्या द्वितीय फेरीच्या स्पर्धे साठी निवड करण्यात आली. द्वितीय व अंतिम फेरी आय. आय. टी. खरगपूर (पश्चिम बंगाल) येथे पुनःश्च दोन दिवसीय कार्यशाळे नंतर होणार असून तेथे अंतिम विजयी संघाला मानचिन्ह व रोख रक्कम ५०,०००/- रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात येणार आहे.
प्रथम फेरीच्या हे पाच विजेते पुढील प्रमाणे
१) श्री. श्रीकांत जोशी- सुरत, गुजरात
२) श्री. महेश बोरकर- आर. सी. पटेल फार्मसी, शिरपूर
३) श्री. संदेश लोढा- सुरत, गुजरात
४) श्री. प्रशांत चौधरी-आर. सी. पटेल फार्मसी, शिरपूर
5) कुमारी क्षिप्रा कर्णिक- औरंगाबाद, महाराष्ट्र
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सी. आर. पाटील, डॉ. हरून पटेल, डॉ. दीपक लोकवाणी यांनी परिश्रम घेतले.
ह्या पाच दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळे साठी संस्थेचे अध्यक्ष मा. आ. श्री. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष श्री. भूपेशभाई पटेल, तसेच उपाध्यक्ष श्री. राजगोपालजी भंडारी, माजी कुलगुरू, उमवि जळगाव डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा व उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. मान्यवरांनी सर्व सहभागी झालेले विद्यार्थी, अभ्यासक व संशोधकांचे कौतुक केले व पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्यात.

Start Time

10:00 am

August 17, 2019

Finish Time

5:00 pm

August 21, 2019

Address

R. C. Patel Institute of Pharmaceutical Education and Research, Shirpur, district-Dhule, M.S. 425 405